Athani

अथणी येथे जंगम समाजाच्या नेत्यांचे आंदोलन

Share

कुडचीचे आमदार पी राजू यांनी जंगम समाजाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले असून समाजासंदर्भात सरकारला चुकीची माहिती दिली आहे. बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तहसीलदार प्रदीप हिरेमठ यांच्यावर हल्लादेखील करण्यात आला असून याविरोधात अथणी येथे आंदोलन छेडण्यात आले.

अथणी येथे बेड जंगम समाजाच्या वतीने शेट्टर मठाच्या मरूळीसिद्ध स्वामींच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंबेडकर सर्कल येथे मानवी साखळीच्या माध्यमातून आंदोलन छेडून पी राजू यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी अथणीचे तहसीलदार दूंडाप्पा कोमार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना बेड जंगम समाजाचे नेते चन्नय्या ईटनाळ म्हणाले, आमदार पी राजू यांनी आमच्या समाजाविरोधात सरकारला चुकीची माहिती दिली आहे. तसेच हुमानाबाद येथील तहसीलदारांवर हल्ला करण्यात आला असून याच्या विरोधार्थ आज आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जंगम समाजाचे अध्यक्ष पंचाक्षरी अळ्ळीमट्टी, पुट्टु हिरेमठ, शरणु वस्त्रद, राजशेखर पुजारी, गुरूशांतय्या करडीमठ, ईरय्या मठपती आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: