भाजप सोडून काँग्रेसमध्ये कोणी जाणार नाही. परनु सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या संघर्षामुळे आगामी काळात अनेकजण काँग्रेसला रामराम ठोकतील, यात तिळमात्र शंका नाही, अशी भविष्यवाणी करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय.

बेंगळूर येथे माणिक शहा परेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसला लक्ष्य करत आगामी काळात काँग्रेसला अनेकजण रामराम ठोकणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिद्धरामय्या हे नेहमी खोटे बोलत असल्याचे सांगितले. भाजप सोडणाऱ्या लोकांची त्यांना माहिती आहे परंतु यासंदर्भातील प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नसतात. डीकेशी, सिद्धरामय्या यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. यामध्ये कोणतेही तथ्य, सत्य किंवा वास्तव नाही. एक भूमिका नाही. डीकेशी पुढे जाणार याची असुरक्षितता सिध्दरामय्यांना वाटत आहे यामुळे सिद्धरामय्या अशापद्धतीची विधाने करत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
उत्तर प्रदेश मधील निवडणुकीमध्ये काँग्रेस उतरणार नाही. पंजाबमधील सत्ताही काँग्रेस गमावत असून गोव्यामध्ये काँग्रेस सत्तेवर येण्यासारखी परिस्थिती नाही. पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यावर देशातील काँग्रेसचे अस्तित्व संपून जाईल. जेव्हा देशपातळीवर एखादा पक्ष संपुष्ठात येतो त्यावेळी त्याचा प्रभाव राज्यावरदेखील पडतो. आणि याच अनुषंगाने राज्यातील काँग्रेसलाही राजकारणाचा फटका बसेल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वर्तविली.
रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात कोण आहे यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला. मी एका जबाबदार पदावर असून अशापद्धतीची बेजबाबदार वक्तव्य करणे मला शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजप सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसून, डीकेशी आणि सिद्धरामय्या यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेस पक्षालाच बहुसंख्य जण राम राम ठोकतील अशी भविष्यवाणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


Recent Comments