खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर आज शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

खानापूर तहसील कार्यालयातर्फे बुधवारी मलप्रभा क्रीडांगणावर आज शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम झाला. यावेळी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी महात्मा गांधी आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रभारी तहसीलदार के. वाय. बिद्री यांनी तिरंगा फडकावला. 
यावेळी बोलताना आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी भारतीय घटनेची प्रस्तावना वाचून दाखवत घटनेचा अर्थ सांगून सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खानापूर तालुक्यात कोरोना लसीकरण यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या वतीने २०२०-२१ साठी देण्यात आलेल्या स्वयंचलित तिचाकींचे खानापूर विधानसभा मतदार संघातील लाभार्थींना आ. निंबाळकर यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


Recent Comments