Belagavi

आयजीपी कार्यालयात प्रजासत्ताक दिन

Share

 बेळगावातील उत्तर विभाग पोलीस परिक्षेत्राच्या कार्यालयात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगावात बुधवारी सकाळी उत्तर विभाग पोलीस परिक्षेत्राचे क्लब रोडवरील कार्यालयात आयजीपी सतीशकुमार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, डीवायएसपी, सीपीआय तसेच आयजीपी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस खात्यात उल्लेखनीय सेवेबद्दल जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलाचे निरीक्षक दस्तगीर मोहम्मद हनीफ घोरी यांना आयजीपी सतीशकुमार यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

Tags: