Athani

भाजपमध्ये आलेले कोणीही बाहेर जाणार नाहीत : आ. महेश कुमठळ्ळी

Share

 राज्याच्या राजकारणात २०२३ पर्यंत नेतृत्व किंवा सत्ताबदलासारखा कोणताही बदल होणार नाही असा दावा अथणीचे . महेश कुमठळ्ळी यांनी केला आहे

अथणी येथे बुधवारी पत्रकारांशी पत्रकारांशी बोलताना आ. महेश कुमठळ्ळी म्हणाले, २०२३ पर्यंत राज्याच्या राजकारणात कसलाही बदल होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपच सत्तेवर राहील. भाजपमध्ये बाहेरून आलेले कोणीही पक्ष सोडून जाणार नाही, अगदी मी सुद्धा नाही असे ते म्हणाले.  आम्ही काँग्रेस सोडला त्यावेळची गोष्ट वेगळी होती. तो संपलेला विषय आहे. लक्ष्मण सवदी आणि मी आमच्या मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. भारतीय जनता पक्ष घेईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत असे आ. महेश कुमठळ्ळी म्हणाले.

एकंदर, भाजपचे काही आमदार आपल्या संपर्कात आहेत असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांच्या विधानावर आ. महेश कुमठळ्ळी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Tags: