बेळगावमध्ये सध्या थंडीचे प्रमाण अधिक झाला आहे. यादरम्यान रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या एका निराधार वृद्धाला सेवा फाउंडेशनच्यावतीने आधार देण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील दुकानासमोर एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर कुडकुडत झोपली होती. सदर बाब फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि संतोष दरेकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानुसार सेवा फाउंडेशनचे अकील बेपारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने याठिकाणी भेट देऊन सदर वृद्ध व्यक्तीची सोया खासबाग येथील निराधार केंद्रात केली आहे.
सदर वृद्ध व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील सांगली येथील असल्याचे समजते. तात्यासाहेब गुंडवाडे असे या वृद्धांचे नाव असून जवळपास ८० वयोगटातील हा वृद्ध मराठी आणि हिंदी भाषा बोलत आहे. मुलाचे नाव संजू आणि नातवाचे नाव ऋतू असे आहे. महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथून हि वृद्ध व्यक्ती याठिकाणी आली आहे, अशी माहिती संतोष दरेकर यांनी दिली आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक डीसीपी रवींद्र गडादी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.


Recent Comments