दुचाकीस्वाराला बसणारी धडक टाळण्याच्या चालकाच्या प्रयत्नात बस रस्त्याशेजारील खड्ड्यात गेल्याची घटना धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील कुमारगोप्प गावाजवळ घडली. यात सुदैवानेच प्राणहानी टळली.
होय, परिवहन मंडळाच्या रोण डेपोची केए २६ एफ १०४४ क्रमांकाची धारवाडहून प्रवासी घेऊन रोणकडे चालली होती. नवलगुंद शहराबाहेरील कुमारगोप्प क्रॉस जवळ बस येताच अचानक बससमोर एक दुचाकी आडवी अली. त्यावेळी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या चालकाच्या प्रयत्नात बस रस्त्याशेजारील खड्ड्यात गेली. यावेळी बसमधील १९ प्रवाशांत घबराट पसरली. ९ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. मात्र सुदैवाने प्राणहानी टळली. जखमी प्रवाशांवर स्थानिक इस्पितळात उपचार करण्यात आले. याबाबत नवलगुंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Recent Comments