Chikkodi

कोगनोळीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Share

 निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

४० वर्षीय किरण देसाई या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो बुदीहाळ येथील एका गारमेंट फॅक्टरीत नोकरी करत होता. त्याची पत्नी माहेरी गेली असता, घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. यमतगचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किरणच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

 

 

 

Tags: