Chikkodi

त्या’ बैठका पक्ष संघटनेसाठी : आम. पी राजीव

Share

सध्या भाजपमध्ये दुमत असल्याची चर्चा रंगत असताना उमेश कत्ती यांनी बोलाविलेल्या बैठकीबद्दल जोरदार कुतूहल निर्माण झाले आहे. या बैठकीसंदर्भात चर्चा रंगत असून याबाबत रायबाग कुडची चे आमदार पी राजीव यांनी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असून भाजपमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना पी राजीव म्हणाले, पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून विशेष भर देण्यासंदर्भात प्रेज प्रमुखांच्या नियुक्तीची जबाबदारी पुढे येत आहे. यासाठी सभा-बैठकांचे आयोजन करण्यात येत असून पक्ष संघटनेसाठी या बैठका घेण्यात येत असल्याचे सांगत याविषयी अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नसल्याचे पी राजीव म्हणाले.

मुख्यमंत्री बदलासंदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी याबाबत कोणतीही उलट सुलट चर्चा करून कोणतेही अंदाज न लावण्याचे सांगितले. पक्षामध्ये कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वजण महत्वाचे असून कोणाचेही महत्व कमी अथवा अधिक नसल्याचे ते म्हणाले.

सध्या अथणी जिल्ह्याच्या विषय हा सर्व आमदारांमध्ये महत्वाचा मानला जात असून आगामी काळात प्रशासकीय दृष्टिकोनातून विभाजन करणे योग्य असेल, असेही मत पी राजीव यांनी व्यक्त केले.

Tags: