Belagavi

‘लिंगराज’च्या विद्यार्थ्यांची बेळगावात मतदान जागृती फेरी

Share

 बेळगावातील लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी बेळगावात मतदान जागृती फेरी काढली.

होय, २५ जानेवारी १९५० रोजी देशात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आज बेळगावातही राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी बेळगावात मतदान जागृती फेरी काढली. प्राचार्या डॉ. तेजस्वी बी. एम. यांनी महाविद्यालयासमोर फेरीला मार्गस्थ केले.

यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वीरभद्रप्पा हिरेमठ म्हणाले, देशभरात दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार जागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २५ जानेवारी १९५० रोजी देशात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली देशात उत्तम सरकार, उत्तम लोकप्रतिनिधी निवडण्यात येत आहेत. याबाबत अयोग्य मतदारांमध्ये जागृतीही करत आहे. त्यामुळे मतदानाचे महत्व समजून सांगण्यासाठी जागृती फेरी काढण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

लिंगराज महाविद्यालयापासून सुरु झालेली ही फेरी गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार आदी भागात फिरून पुन्हा महाविद्यालयात येऊन विसर्जित करण्यात आली. विध्यार्थ्यानी हातात मतदान जागृतीसंदर्भात फलक घेऊन फेरीत जनजागृती केली.

 

 

 

Tags: