देशभरात आज 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे बेळगावातही आज बालिका दिन साजरा करण्यात आला.

होय, आजच्याच दिवशी 24 जानेवारी 1966 ला इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. म्हणून 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बेळगावातही आज केएलई संस्थेच्या गिलगिंची अरटाळ अर्थात जीए महाविद्यालयात अर्थपूर्णरीत्या बालिका दिन साजरा करण्यात आला. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा सक्षम प्राधिकरण, जिल्हा सल्ला समिती, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघ यांच्या संयुक्त विध्यमाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘ती नसेल तर जगाचे काय होईल विचार करा’ या घोषवाक्यासह राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. खा. मंगल अंगडी यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद म्हणाल्या, जागृती हा शब्द खूप अद्भुत आहे. महिलांवर त्या बालिका असताना पासूनच अन्याय केला जातो. त्याबाबत बालपणापासूनच महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. स्त्री भ्रूण हत्यांमुळे समाजात महिलांची संख्या घटत आहे. हे असेच सूरु राहिल्यास जगात पुढे स्त्री किंवा पुरुष कोणीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून याबाबत जागृती केली जातेय हे प्रशंसनीय आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. ईश्वर गडाद, डॉ. रूप बेल्लद, उपप्राचार्य एस. आर. गरग, डॉ. मनीषा भांडणकर, डॉ. राजेंद्र सलगरे, डॉ. भावना कोप्पद, डॉ. एम. व्ही. किवडसनानावर यांच्यासह जीए कॉलेजचे प्राध्यापक, विध्यार्थी आदी उपस्थित होते.


Recent Comments