Athani

स्वखर्चातून युवकाने दिला सरकारी शाळेला संगणक भेट

Share

हल्ली सरकारी शाळांकडे शासनाचे आणि समाजाचे दुर्लक्ष होत आहे.परंतु समाजातील काही व्यक्ती आजही समाजासाठी कार्य करताना दिसून येतात. चिकोडी तालुक्यातील करोशी गावातील एका युवकाने समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य जाणून सरकारी शाळेला मोफत संगणक भेटीदाखल दिले आहे.

चिकोडी तालुक्यातील करोशी या गावातील ओंकार एकनाथ शेंडुरे असे या युवकाचे नाव असून या युवकाने स्वखर्चातून सरकारी मराठी शाळेला संगणक भेटीदाखल दिले आहे. करोशी मराठी शाळेला अनेक दशकांपासून इतिहास आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज समाजात मोठ्या हुद्द्यावर, अव्वल स्थानी कार्यरत आहेत. हल्ली पालकांची ओढ हि इंग्रजी माध्यमाकडे अधिक आहे. यामुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. सरकारी शाळाही खाजगी शाळांप्रमाणेच राहाव्या या प्रयत्नातून ओंकार शेंडुरे या युवकाने समाजाभिमुख कार्य केले आहे. शालेय शिक्षक आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत ओंकारने संगणक संच सरकारी शाळेला भेटीदाखल दिला आहे.

यावेळी करोशी मराठा समाजाचे नेते दत्तात्रय बिद्रे, सुरेश मांगुरे, गोविंद झुटाळे, गणपती पवार, कृष्णा काटकर, अनिल जेधे, शिवाजी डोंगरे, जयवंत जाधव, काशिनाथ सुळकुडे, ज्ञानेश्वर खडे, सागर जेधे, नारायण जेधे, प्रमोद काळे, मारुती होगले, सुनील शेंडुरे आदी उपस्थित होते.

Tags: