बेळगावात शनिवारी काही भाजप नेत्यांनी काहीजणांना वगळून बैठक घेतल्याचे प्रसारमाध्यमातूनच समजले आहे असे अरभावीचे आ. व केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

याबाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भालचंद्र जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून अशी सभा घ्यायची गरज नव्हती. पण ही भाजपची अधिकृत सभाही नव्हती. त्यामुळे तिला अधिक महत्व द्यायची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात कोण किती पक्षासाठी काम करतोय हे पक्षनेतृत्वाला चांगले माहित आहे. रोज अशी एक सभा घेतली म्हणून त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या भानगडीत पडणार नाही. २००८ पासून पक्षाचा शिस्तीचा शिपाई म्हणून काम करतोय. पक्ष बळकट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न करतोय, अशा गुप्त सभा-घडामोडींवर पक्षाचे नेते नजर ठेवून आहेत अशा शब्दांत भालचंद्र जारकीहोळी यांनी भाजप नेते-आमदारांच्या गुप्त सभेवर प्रतिक्रिया दिली आहे.


Recent Comments