Banglore

राज्यात कोविड परिस्थिती पाहून पुढील निर्णय; कडक निर्बंधांचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Share

 राज्यात कोविड परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येतील असे सांगतानाच संभाव्य कडक निर्बंधांचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिले. 

सोमवारी बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सरकारने विकेंड कर्फ्यू नुकताच मागे घेतला आहे. आता यापुढे राज्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येतील. संसर्ग वाढत राहिल्यास सरकारी पातळीवर चर्चा करून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले, याबाबत अद्याप काहीएक निर्णय झालेला नाही. याबाबत पक्ष काय निर्णय घेईल तशी कृती केली जाईल. सध्या तरी माझ्यापर्यंत याबाबत काही आलेले नाही, कसला विचार, निर्णय झालेला नाही. पक्षात चर्चा झाल्यास यावर निर्णय घेण्यात येईल.

अर्थसंकल्प मांडण्यासंदर्भातील बोलताना बोम्मई म्हणाले, याबाबत पूर्वतयारी करण्यात येत आहे. याबाबत अनेक खात्यांसोबत डिसेंबरमध्येच खात्यांतर्गत सभा घेऊन चर्चा करण्यात आलेली आहे. डिसेंबरअखेरीस कोरोना संसर्ग वाढल्याने अर्थ खात्यासोबत आणखी एक सभा घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यानंतर विविध संघ-संस्थांसोबत चर्चा करून अर्थसंकप्ल तयार करण्यात येईल.

मंत्रिमंडळ विस्तार करायचा असेल तर तो येत्या ३ महिन्यांच्या आतच करावा अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळात सध्या ४ मंत्रीपदे खाली आहेत. त्यामुळे इच्छुकांनी इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही. विस्तार कसा करायचा हे सरकारमधील वरिष्ठांच्या ध्यानात आहे. ते जेंव्हा मला बोलावून विचारणा करतील तेंव्हा मी त्यांना भेटून सगळी माहिती देईन असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सरकार, भाजप हायकमांड कधी आणि काय भूमिका घेते हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

 

 

Tags: