Belagavi

पक्षनिष्ठ राहण्यासाठी शपथविधी महत्वाचा : सतीश जारकीहोळी

Share

काँग्रेस आमदारांनी पक्षाची फसवणूक करू नये, यासाठी काँग्रेस आमदारांकडून शपथ घेतली जात असून यात चुकीचे काही नाही असा अभिप्राय केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस आमदारांच्या शपथविधी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मागील वेळी काही आमदारांनी काँग्रेसला हात देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाची फसवणूक यापुढील काळात कोणत्याही आमदाराने करू नये यासाठी शपथ घेतली जात असल्याचे ते म्हणाले. शिवाय हा शपथविधी योग्य असल्याचेही सतीश जारकीहोळी म्हणाले.

यानंतर गोवा येथे होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, कि ग्राउंड रिपोर्ट देण्यासाठी आधीच तेथे काही नेते आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात रणनीती आखण्यात येणार आहे. दिनेश गुंडूराव, पी चिदंबरम यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून गोव्यात जाऊन तेथील निवडणूक रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यात तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बोलताना जारकीहोळी म्हणाले, राज्य सरकारने यासंदर्भात कमिटीला अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. कमिटीने अहवाल दिल्यास वर्गीकरण करण्यात येणार आहे. आणि आरक्षणानुसार निवडणुका पार पडणार असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीची तयारी काँग्रेसने केली असल्याचेही सतीश जारकीहोळी म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून काँग्रेस पक्षाच्यावतीने शपथ घेतली जात आहे. हा शपथविधी योग्य असून यात चुकीचे काहीच नसल्याचे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Tags: