बेळगावात घेतलेल्या गुप्त बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कसलीच चर्चा झाली नाही. पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात चर्चा झाली असे स्पष्टीकरण वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिले आहे.
गेल्या शनिवारी मंत्री उमेश कत्ती यांच्या बेळगावातील निवासस्थानी चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्यासह अनेक आमदार आणि भाजप नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. त्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करून आ. अभय पाटील , आ. पी. राजीव यांना मंत्रिपद देण्यासाठी आग्रह करण्याचे ठरविल्याचे वृत्त आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती यांनी मात्र अशी चर्चा झाल्याचा इन्कार केला.
ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री आणि हायकमांड आहेत. आम्ही केवळ पुढील तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात उमेदवार कसे निश्चित करायचे? कोणत्या क्षेत्रात कसे काम करायचे? आदी मुद्यांवर जिल्हा पंचायतीतील बैठकीत चर्चा केली आहे. या बैठकीला कोण हजर होते तर कोण आले नाहीत. जारकीहोळी ब्रदर्सना किंवा अन्य कोणाला वगळून बैठक घेतली नाही. आमच्यात कोण मोठा किंवा लहान नाही. महांतेश कवटगीमठ गेल्या एमएलसी निवडणुकीतील पराभूत उमेदवार. पण त्यांच्यासह सर्वच आमदारांना या बैठकीला बोलावले होते असे कत्ती यांनी स्पष्ट केले.
एकंदर, कत्ती यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केवळ पक्ष संघटनेवर चर्चा झाली, मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे असे उमेश कत्ती यांनी यावेळी स्पष्ट केले.


Recent Comments