बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना नागा साधूंनी आशीर्वाद दिल्याची घटना बेळगावात सोमवारी घडली.

होय, बेळगावातील संकम हॉटेलमध्ये आज, सोमवारी सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या वतीने दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी ‘जिंकण्याचा पण आमचा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. हा कार्यक्रम आटोपून आ. लक्ष्मी हेब्बाळकर बाहेर आल्या. त्याचवेळी तेथे आलेल्या नागा साधूंनी आ. हेब्बाळकर यांना गाठून दर्शन दिले. ‘जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल’ असा तोंडभरून आशीर्वाद या नागा साधूंनी त्यांना दिला.
यावेळी काँग्रेस नेते गजानन मंगसुळी, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments