Belagavi

चव्हाट गल्लीत शॉर्टसर्किटने सिलेंडरचा स्फोट होऊन आग

Share

 शॉर्ट सर्किटने गॅस सिलेंडरचा सफपँट झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. सुदैवानेच या घटनेत प्राणहानी टळली आहे.

होय, शॉर्ट सर्किटमुळे घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना बेळगावातील चव्हाट गल्लीतील एका घरात आज सकाळी ११च्या सुमारास घडली. शहापूरकर नामक व्यक्तीच्या घरात आधी शॉर्ट सर्किट झाले.

त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. हे पाहून घरातील महिलांनी खाली धाव घेतल्याने त्यांचा जीव बचावला. स्थानिकांनी लागलीच अग्निशामक दलाला व पोलिसांना पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविली. मात्र या आगीत सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. या संदर्भात मार्केट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

Tags: