बेळगाव शहरात बेकायदेशीर रित्या सुरु करण्यात येत असलेल्या खाजगी एपीएमसीचे कामकाज स्थगित करण्यात यावे, यासाठी बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनाला कोणतेच प्रत्त्युत्तर देण्यात आले नसून खाजगी एपीएमसी विरोधात नेगीलयोगी शेतकरी सुरक्षा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव शहरात सरकारी एपीएमसी असूनही खाजगी एपीएमसी उभारण्यात आली आहे. या एपीएमसीच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच काही शेतकरी, सरकारी एपीएमसीमधील व्यावसायिक विरोध दर्शवत आहेत. बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी निवेदन स्वीकारले. परंतु या निवेदनाला कोणतेच प्रत्त्युत्तर देण्यात आले नसून खाजगी एपीएमसी विरोधात नेगीलयोगी शेतकरी सुरक्षा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले तसेच बेळगाव प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नेगीलयोगी शेतकरी सुरक्षा संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर, बोलताना म्हणाले, बेळगावमध्ये बेकायदेशीर रित्या खाजगी एपीएमसी निर्माण करण्यात आली आहे. सदर एपीएमसीचे कामकाज स्थगित करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हि एपीएमसी त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले. (बाईट)
यावेळी नेगीलयोगी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments