कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी गोरगरिबांना आणि रस्त्याकडेला झोपणाऱ्या निराश्रितांना ब्लॅंकेट्सचे वाटप करून बेळगावातील डिव्हाईन हेलपिंग हॅन्ड ग्रुपने माणुसकीचे दर्शन घडविले.

होय, गरिबांचे महाबळेश्वर म्हणवले जाणाऱ्या बेळगावात गेल्या काही दिवसांत जणू काश्मीर भासावे अशी कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे नागरिक गारठून जात आहेत. घरीच बसून गरम, उबदार राहण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. मात्र गोरगरीब आणि रस्त्याच्या कडेला राहून दिवस कंठणाऱ्या असहाय लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डिव्हाईन हेलपिंग हॅन्ड ग्रुपने अशा लोकांना ब्लॅंकेट्सचे वाटप केले. गजानन गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शहर व परिसरात फिरून गरजूना ब्लँकेट्स वाटली. यासंदर्भात गजानन गव्हाणे यांनी ‘आपली मराठी’ला अधिक माहिती दिली.
यावेळी सुधीर पवार, भावेश वसुलकर, पांडुरंग पवार, आशिष गव्हाणे, प्रथमेश काकतकर, संतोष कांबळे यांच्यासह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments