Belagavi

हनुमान नगरातील ‘त्या’ अपार्टमेंटचे काम पुन्हा सुरु

Share

 न्यायालयाची स्थगिती असूनही बेळगावातील हनुमान नगरमध्ये बुडा भूखंडावर अनधिकृतरित्या अपार्टमेंट बांधण्याचे काम बिनदिक्कत सुरु असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

होय, बुडाच्या नियमांप्रमाणे बुडणे मंजूर केलेल्या भूखंडांवर केवळ व्यक्तिगत घरेच बांधता येतात. मात्र हनुमान नगरातील एका भूखंडावर एक खासगी विकसक स्वतः अपार्टमेंट बांधत आहे. याच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने स्थानिकांच्या अर्जावर सुनावणी करून अपार्टमेंटच्या कामाला स्थगिती दिल्याचा आदेश जारी केला आहे.

त्यामुळे हे काम काही दिवस थांबले होते. मात्र आता न्यायालयाच्या डोळ्यात धूळफेक करून बिनदिक्कत या अपार्टमेंटच्या कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात आल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. बुडा अधिकाऱ्यानी त्याकडे काणाडोळा केल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

Tags: