खानापूर तालुक्यातील निलावडे गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.

होय, निलावडे गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्यांच्या कामाला आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांसमवेत कुदळ मारून चालना दिली. २०१९-२०च्या नाबार्डच्या आयआरएफडी योजनेतून ४४ लाख रुपये अनुदान या वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मंजूर झाले आहे. त्यातून हे काम करण्यात येत आहे. भूमिपूजन प्रसंगी निलावडे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.



Recent Comments