Belagavi

एम के हुबळी साखर कारखान्यात घोटाळा : चौकशीचे आदेश

Share

एम के हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाला असून यासंदर्भात बेळगाव साखर संचालनालयाचे आयुक्त शिवानंद कलकेरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

२०१७-१८ सालच्या उसाचीथकबाकी, मलप्रभा साखर कारखान्यातील हिशोबात घोटाळा, शेतकरी आणि इतरांच्या नावावर घेण्यात आलेली कर्जे असे अनेक आरोप करत या कारखान्याच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासकीय मंडळ आणि येथील अधिकाऱ्यांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून रात्रंदिवस धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साखर मंत्र्यांच्या निर्देशानुसार साखर संचालनालय आयुक्त शिवानंद कल्केरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक सहकारी संघ अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ६४ अन्वये चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात साखर आयुक्त शिवानंद कलकेरी यांनी बोलताना सांगितले कि, मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात अव्यव्हार केल्याची तक्रार आली असून चौकशीसाठी जिल्हास्तरीय समिती नेमण्यात येणार असून तपस आणि चौकशी करून येत्या तीन महिन्यात अहवाल देण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगितले.

एम के हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याविरोधात अनेक तक्रारी पुढे आल्या असून शेतकऱ्यांच्या तक्रारीचा विचार करून साखर मंत्र्यांच्या निर्देशाखाली साखर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tags: