Belagavi

बेळगावात स्मार्ट सिटीची कामे ठप्प; नागरिकांचा आक्रोश

Share

 बेळगाव शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेतील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांतून  आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे.

: होय, बेळगावातील क्लब रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेतून सुरु असलेली कामे संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचण होत असून, ही कामे संपणार तरी कधी असा प्रश्न येथील रहिवासी करत आहेत.  स्मार्ट सिटी योजनेत बेळगावची निवड झाल्यानंतर नागरिकांमध्ये समाधान पसरले होते. मात्र कूर्मगतीने सुरु असलेल्या कामांमुळे लोकांच्या त्रासात भरच पडत आहे. क्लब रोडवरील संथगतीने सुरु असलेल्या कामांमुळे लोकांचा त्रास दूर होण्याऐवजी त्यात भर पडली आहे. काम सुरु असल्याबाबतचे फलकही न लावता कामे करण्यात येत आहेत. चांगल्या डांबरीकरणाऐवजी रस्त्यात कुठेही सिमेंट ब्रिक्स वापरण्यात येत आहेत.  फ्लो या संदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना ममता नामक महिलेने सांगितले की, सुमारे वर्षभरापासून क्लब रस्त्यावर कामे सुरु आहेत. ती अतिशय संथगतीने सुरु असल्याने रहिवाशांना आणि वाहनचालकांनाही त्रास होत आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांची ही परिस्थिती असेल तर अंतर्गत रस्त्यांची काय परिस्थिती असेल असा सवाल त्यांनी केला.

यावेळी आणखी एका नागरिकाने सांगितले की, क्लब रोड परिसरात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. हजारो मुले-विध्यार्थी येथे ये-जा करतात. सकाळी फिरायलाही शहराच्या अनेक भागातून लोक येथे येतात. मात्र विकासकामे लवकर पूर्ण केली जात नसल्याने सगळ्यांना त्रास होत आहे. सध्या येथे ड्रेनेज लाईन घालण्याचे काम सुरु आहे. मात्र कसलीही दक्षता न घेता ते सुरु आहे. काम सुरु असल्याचे फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास त्याला कोण जबाबदार असा सवाल त्यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना केला.

एकंदर, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता येथील कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

Tags: