तुमकूर श्री सिद्धगंगा मठात डॉ. शिवकुमार स्वामींच्या लिंगैक्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दासोह कार्यक्रमात मुख्यम्बत्री बसवराज बोम्मई यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रजावान करून तसेच विद्यार्थ्यांना अन्न वितरण करून करण्यात आली.

तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा विधी पार पाडण्यात आले. दासोह दिनाच्या औचित्याने श्रीमठातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अन्न देण्यात आले. 
यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्र्यांनी दासोह कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपणदेखील या दासोह परंपरेसाठी संपर्पण दिले असून आमच्या सरकारने दासोह स्वरूपात अनेक कार्यक्रम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक आहार पद्धतीनुसार तांदळासोबत जोंधळा, नाचणे यासारख्या अनेक धान्यांनी समृद्ध असा आहार आपल्या संस्कृतीत आहे. शेतकरी तसेच कामगारांच्या मुलांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून गरीब जनतेच्या सोयीसाठी सरकार अक्षर दासोह कार्यक्रम आखत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सिद्धगंगा श्रींना भारतरत्न देण्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, यासंदर्भात वरिष्ठांची चर्चा करण्यात येत आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी सिद्धगंगा मठाचे श्री सिद्धलिंग स्वामीजी, कायदे आणि संसदीय व्यवहार विभागाचे मंत्री जे सी माधुस्वामी, खासदार बसवराज, आमदार ज्योती गणेश, माजी आमदार सुरेश गौड आदी उपस्थित होते.


Recent Comments