Belagavi

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोविडबाधा

Share

कोविड संसर्गाने सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवरांनीही सोडले नाही. यामध्ये आता बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांचा नंबर आला असून बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांना कोविड ची बाधा झाली आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

व्हॉइस : बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांना कोविड बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय सॅनिटाईझ करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची कोविड टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Tags: