Belagavi

पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आजारी वृद्ध व्यक्तीला केले रुग्णालयात दाखल

Share

बेळगाव शहरातील रस्त्यावर आजारी अवस्थेत असलेल्या वृद्धाला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट याठिकाणी मारुती मंदिर परिसरात एक वृद्ध व्यक्ती आजारी असल्याचे आढळून आले. सदर वृद्ध व्यक्ती रस्त्यावरच राहत असल्याचे निदर्शनास येताच सदर बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या वृद्ध व्यक्तीच्या पायाला सूज आल्याचे दिसून आल्याने सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर, संतोष दरेकर, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह डीसीपी रवींद्र गडादि आणि इतर पोलीस सहकारी यांनी मिळून सदर वृद्धाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी सांगितले कि दुसऱ्या रेल्वे गेट नजीक आढळून आलेल्या या वृद्धाच्या दोन्ही पायाला सूज आली आहे. यामुळे सदर वृद्ध व्यक्तीला आम्ही जिल्हा रुग्णालयात दाखल करत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Tags: