लोंढा ग्रामपंचायत व्याप्तीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सीपीटी कामकाज निर्मिती करणाऱ्या ठिकाणी रोजगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायत व्याप्तीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सीपीटी कामकाज निर्मिती करणाऱ्या ठिकाणी रोजगार दिनाचे आयोजन करून कामगारांना मनरेगा योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली. 
यावेळी तालुका पंचायत आयइसी संयोजक मलिकजण मोमीन बोलताना म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस काम दिले जाते. महिला तसेच पुरुषांना या योजनेंतर्गत समान वेतन देण्यात येते.
यानंतर ग्रामपंचायत विकास अधिकारी बलराज भजंत्री यांनी सांगितले कि, शेती, शेड, शेळीपालन यासारखी विविध वैयक्तिक कामे नरेगा योजनेंतर्गत आणण्यात येत आहेत. याचा प्रत्येक कामगाराने सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कामगारांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होते. कामगारांच्यावतीने आत्मीयतेने या दिनाचे आचरण करण्यात आले. यावेळी शेवरीन ड्यास, सदस्य समीर खानजादे, निळकंठ उसपकर, कुमार पाटील, चिमण राव बांदेकर, डीईओ रफिक कित्तूर, यल्लाप्पा नाईक आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments