Belagavi

रमेश जारकीहोळींची तुलना चक्क राक्षसाशी! *

Share

बेळगावमधील राजकारणात हेब्बाळकर वर्सेस जारकीहोळी वाद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. नेहमीच उभयतांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका टिप्पणी होत असते.. आता तर ग्रामीण आमदार लक्ष्मी जारकीहोळी यांनी आमदार रमेश जारकीहोळी यांची तुलना चक्क राक्षसाशी केली आहे… पाहुयात हा वाद नेमका कशासंदर्भात चर्चेत आलाय…

ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा एकदा रमेश जारकीहोळी यांना टोला लगावला असून त्यांची तुलना चक्क राक्षसाशी केली आहे. राक्षस आपल्या जीवनात येतात अन जातात… परंतु सूर्य चंद्र हे कायम राहतात… अशा शब्दात जारकीहोळी यांना टोला लगावलाय. जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही विकास कामे करत आहोत. आणि यापुढील काळात देखील करत राहू… अशा शब्दात त्यांनी रमेश जारकीहोळींवर निशाणा साधलाय….

बेळगाव तालुक्यातील माविनकट्टी या गावात रस्ते कामकाजाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कुदळ पूजनाने या कार्याला शुभारंभ केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकरांनी रमेश जारकीहोळींना टोला लगावत काही जण सूर्याला लागलेल्या ग्रहणाप्रमाणे असल्याचे वक्तव्य केले. जोवर सूर्य चंद्र आहेत…. तोवर जनतेचा आशीर्वाद आहे.. आणि जनतेच्या आशीर्वादाने असेच काम मी करत राहीन, अशी प्रतिक्रियाही हेब्बाळकरांनी दिली आहे.

२ वर्षांपूर्वी साडेचार कोटी रुपयांचे टेंडर आणि वर्क ऑर्डर मिळाली होती. दुर्दैवाने त्याचवेळी काँग्रेस सरकार पडले आणि रमेश जारकीहोळी हे जलसंपदा मंत्री झाले. आणि त्याक्षणापासून बेळगाव ग्रामीण भागाला अनुदान मिळणे बंद झाले. या सर्व गोष्टींना इंजिनियर, सरकारी प्रतिनिधी साक्ष आहेत. १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे, अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकरांनी दिली.

बेळगावच्या राजकारणात हेब्बाळकर व्हर्सेस जारकीहोळी हे वाक्युद्ध नेहमीच सुरु असते. आता लक्ष्मी हेब्बाळकरांनी लागवलेल्या या टोल्याला जारकीहोळी कशा पद्धतीने उत्तर देतात याची प्रतीक्षा आहे.

Tags: