Athani

मतिमंद मुलांना कपडे वाटप, विधवांची भरली ओटी !

Share

 अथणी येथे कृपा आरोग्य आणि समाजसेवा संस्थेच्या वतीने मतिमंद मुले, असहाय व्यक्तीना कपडे आणि विधवांची ओटी भरून नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले

होय, बेळगाव जिह्यातील अथणी येथील आयएमए सभागृहात नव्या वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मतिमंद मुले, असहाय व्यक्तीना कपडे वाटप करण्यात आले तर विधवा महिलांची ओटी भरण्यात आली. वंचितांच्या जीवनात आनंदाचे, आशेचे किरण, क्षण आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.

याप्रसंगी अथणीचे आ. व झोपडपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळ्ळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृपा संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक कार्यक्रमांना आजवर गेलो आहे, पण असा कार्यक्रम प्रथमच पहात आहे. पोट भरलेल्याला जेवू घातल्याने अन्नाचे महत्व समजत नाही, पण भुकेल्याला अन्न दिल्याने त्याला त्याचे महत्व कळते.

असहाय, मतिमंद आणि एड्सबाधित मुले आणि विधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणल्याबद्दल कृपा संस्थेचे अध्यक्ष निजप्पा हिरेमनी आणि त्यांच्या पत्नी संगीत यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. हिरेमनी दांपत्य गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आले आहेत.

 

 

 

Tags: