Belagavi

आ. अनिल बेनके अडचणीत ! कोविड नियमांचा भंग केल्याचा गुन्हा

Share

 कोविड नियमांचे उल्लंघन करून म्हैस पळविण्याचा स्पर्धेत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक कार्यक्रमात भाग घेतल्यावरून बेळगाव उत्तरचे . अनिल बेनके यांच्यासह २७ जणांवर बेळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होय, मेकेदाटू पदयात्रा काढून कोविड नियमांचे उल्लंघन केल्यावरून काँग्रेस नेत्यांवर ज्याप्रकारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्याचप्रकारे बेळगावात आता आ. अनिल बेनके यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मकर संक्रांतीनिमित्त म्हैस पळविण्याचा स्पर्धेच्या उदघाटन समारंभात आणि नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक कार्यक्रमात भाग घेतल्यावरून बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांच्यासह २७ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी केवळ आयोजकांवर तेवढाच गुन्हा दाखल केला होता. मात्र कार्यक्रमाचे व्हिडिओ, निमंत्रण पत्रिका आदी पाहून आ. बेनके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक सांसर्गिक रोग प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

Tags: