Belagavi

जिल्ह्यात न्यायालयात पक्षकार, जनतेला पुन्हा प्रवेशबंदी

Share

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वकील वगळता पक्षकार आणि जनतेला न्यायालयात येण्यास प्रतिबंध केल्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

होय, कोरोनाचा आणि ओमीक्रॉनचा संसर्ग गेल्या काही दिवसांत कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने दक्षता घेत वकील वगळता पक्षकार आणि जनतेला न्यायालयात येण्यास प्रतिबंध केल्याचा आदेश बजावला आहे. त्यानुसार आजपासून बेळगाव जिल्हा न्यायालयात आजपासून पुढील आदेशापर्यंत जनतेला न्यायालयात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. वकील वगळता पक्षकार आणि नागरिकांना आज या आदेशानुसार परत पाठवून देण्यात आले. फ्लो

या संदर्भात माहिती देताना ऍड. अण्णासाहेब घोरपडे यांनी सांगितले की, राज्यातील इतर भागाप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यालयात जनतेला प्रवेश नाकारण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या एसओपीनुसार केवळ महत्वाच्या सुनावण्याच होणार आहेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत जनतेला प्रवेशबंदी केली आहे. बाईट

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे वकीलवर्गाने स्वागत केले आहे. कोरोना महामारी लवकरात लवकर   हद्दपार व्हावी अशीच अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली आहे.

 

Tags: