Chikkodi

अथणीत लक्ष्मीदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा

Share

अथणी परिसरातील श्री लक्ष्मी देवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा वन, अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री तसेच ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते पार पडला.

या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री तसेच विधान परिषद मंत्री लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. (फ्लो)

यावेळी मंत्री उमेश कत्ती बोलताना म्हणाले, कर्नाटकात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. शेजारील आंध्र, तामिळनाडी तसेच केरळमध्ये असणाऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड तसेच वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच रोजवुड, टिकवूड सह साठहुन अधिक रोपांची लागवड करण्याचे हक्क शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव आहे. २१ टक्के असलेले वनक्षेत्र ३३ टक्के वाढविण्याचा विचार सुरु असून महसूल मिळणाऱ्या जागेचा वनीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याचे कत्ती म्हणाले.

अथणी तालुक्यात ८५० एकर जमीन असून ती वाढवण्याची आवश्यकता आहे. विजापूर, बागलकोट सह तीन जिल्ह्यातील पाणथळ जमिनीत बांबूचे उत्पादन घेण्याचा प्रायोगिक कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. बांबूचे उत्पादन निर्यात करणे शकत असल्याचे कत्ती म्हणाले

यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी म्हणाले, मंत्री उमेश कत्ती यांनी वनविभागाला आवश्यक असलेल्या कामांना पूरक अशी तयारी केली आहे. आपण नागरिक या नात्याने सरकारी अनुदानाचा योग्य वापर करणे आवश्यक असून या उद्यानात हजारो रोपांची लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सवदींनी सांगितले.  सध्या निसर्गात होत असलेल्या अनियमिततेला वृक्षांची कमतरता हेच कारण असून वनसंवर्धनासाठी नागरिकांचे सहकार्यहि आवश्यक आहे, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.

या कार्यक्रमाला आमदार महेश कुमठळ्ळी, विशेष अतिथी आरएसएस सहसंघ चालक अरविंद देशपांडे, भारतीय सेनेचे अप्पर प्रधान मुख्य अरण्य संरक्षणाधिकारी श्रीवास्तव, मुख्य अरण्य संरक्षणाधिकारी विजयकुमार सालीमठ, उपसंरक्षणाधिकारी ऍंथोनी मॅरियप्पा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. राकेश मैगुर, इन न्यूज, अथणी

Tags: