Chikkodi

आ. महेश कुमठळ्ळी यांचा नथीआडून तीर ! मंत्रिपदाची इच्छा केली व्यक्त

Share

पक्ष नेत्यांनी कोणतीही जबाबदारी दिली तरी ती सांभाळण्यास मी तयार आहे असा नथीआडून तीर मारत, मंत्रिपदासाठी मीही इच्छुक आहे असे सांगत . महेश कुमठळ्ळी यांनी आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली.

 

होय, चिक्कोडी येथे पत्रकारांशी बोलताना आ. कुमठळ्ळी यांनी आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली. पक्षाच्या राज्य आणि राष्ट्र पातळीवरील नेत्यांनी मला कोणतीही जबाबदारी दिली तरी ती निभावण्यास मी सिद्ध आहे. मी मागणी करणार नाही, परंतु जर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सांगितले तर मी तयार आहे असे आ. कुमठळ्ळी यांनी सांगितले. बाईट

राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबतच्या प्रश्नावर आ. कुमठळ्ळी म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उदभवत नाही. २०२३ पर्यंत बसवराज बोम्मईच मुख्यमंत्री राहतील. २०२३ची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल. बाईट

एकंदर, कर्नाटक मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या प्रतीक्षेत अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या आ. महेश कुमठळ्ळी यांनीही नथीआडून तीर मारत मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे.

 

Tags: