बेळगाव तालुक्यातील कंग्राळी आणि अलतगा येथे कन्नड नामफलकाला काळे फासल्याप्रकरणी २ स्वतंत्र तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत.

होय, बेळगाव तालुक्यातील कंग्राळी आणि अलतगा येथे कन्नड नामफलकाला अज्ञात समाजकंटकांनी काळे फासल्याची घटना नुकतीच घडली होती. याचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी एपीएमसी आणि काकती पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. खात्याने काळे फासलेल्या फलकांना पुन्हा पंधरा रंग देऊन ते स्वच्छ केले आहेत. पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध घेण्यात येत आहे.


Recent Comments