वडगाव येथे बांधण्यात आलेल्या डॉ. आनंदीबाई सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते पार पडले.

बेळगावच्या गरीब आणि मध्यवडगाव येथे बांधण्यात आलेल्या डॉ. आनंदीबाई सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते पार पडले.
बेळगावच्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सोयीसाठी जनतेच्या मागणीस्तव आज वडगाव येथे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २० खाटांची क्षमता असलेल्या डॉ. आनंदीबाई सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार अभय पाटील यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. 
उद्घाटनानंतर बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, या भागातील जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या २० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील काळात ५० खाटांची सोय करण्यात येईल, तसेच आरोग्यविभागाच्या वतीने या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व सामुग्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार अभय पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा वैद्याधिकारी शशिकांत मुन्याळ, तालुका वैद्याधिकारी शिवानंद मास्तिहोळी, नगरसेवक मंगेश पवार, सारिका पाटील आदी उपस्थित होते. मवर्गीयांच्या सोयीसाठी जनतेच्या मागणीस्तव आज वडगाव येथे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २० खाटांची क्षमता असलेल्या डॉ. आनंदीबाई सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार अभय पाटील यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, या भागातील जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या २० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील काळात ५० खाटांची सोय करण्यात येईल, तसेच आरोग्यविभागाच्या वतीने या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व सामुग्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार अभय पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा वैद्याधिकारी शशिकांत मुन्याळ, तालुका वैद्याधिकारी शिवानंद मास्तिहोळी, नगरसेवक मंगेश पवार, सारिका पाटील आदी उपस्थित होते.

Recent Comments