अथणी येथील साई मंदिरपासून आंबेडकर चौकापर्यंत सीसी रस्ता तसेच गटारी कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. या कामकाजाला लक्ष्मण सवदी यांनी चालना दिली.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील साई मंदिरापासून आंबेडकर चौकापर्यंत सीसी रस्ता तसेच गटारी कामकाजाचा शुभारंभ विधान परिषद सदस्य तसेच भाजप राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते कुदळ मारून, पूजन करून करण्यात आला. 
सहा कोटी रुपयांच्या खर्चातून नऊ फूट रुंद आणि पंधराशेहे फूट लांबीच्या रस्ते कामकाजाची सुरुवात करण्यात आली. या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे येथील जनतेने अनेक दिवसांपासून या रस्त्याची मागणी केली होती. हि मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देऊन सदर रस्त्याच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती लक्ष्मण सवदी यांनी दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जे ए हिरेमठ, ए जी मुल्ला, नगरपालिका मुख्याधिकारी इराण्णा रेड्डी, कंत्राटदार राजू अलबाळ, संदीप पाटील, शिवरुद्राप्पा घोळप्पानावर, भाजप नेते चिदानंद सवदी, रामनगौडा पाटील, नगरपालिका सदस्य संतोष सावडकर, कल्लेश मड्डी आदी उपस्थित होते.


Recent Comments