Belagavi

बेळगावात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

Share

बेळगावात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे रविवारी दिसून आले. पोलिसांनी नाकाबंदी कडक केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसल्याचे दिसून आले.

होय, कालच्या आणि गेल्या आठवड्यातील विकेंड कर्फ्यूच्या तुलनेत रविवारी बेळगावात आज विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांअभावी शुकशुकाट दिसून आला. गोवा, महाराष्ट्रासह जिल्ह्यात अंतर्गत संचार करणाऱ्या बसेसमध्ये तुरळक प्रवासी दिसून आले. तास दोन तास प्रवाशांची प्रतीक्षा करून मग पुरेशा प्रवाशांअभावीच बसेस सोडण्यात येत होत्या. त्यामुळे परिवहन मंडळाला विकेंड कर्फ्यूच फटका बसल्याचे जाणवले.

त्याचप्रमाणे बाजारपेठेतही सामसूम झाली होती. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून पोलीस वाहनांची कसून तपासणी करत होते. चौकशी करून खात्री पटल्यानंतरच वाहनचालकांना जाऊ देण्यात येत होते. त्यामुळे एरव्हीच्या तुलनेत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या रोडावली होती.

 

Tags: