जखमी अवस्थेत असलेल्या एका माकडाला खानापूरचे माजी आमदार आणि डीसीसी बँकेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी मदत केली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खानापूर मधील प्रभूनगर येथे जखमी अवस्थेत असलेल्या एका माकडाच्या पिलाला पाणी पाजून माजी आमदारांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
प्रभूनगर येथे जखमी अवस्थेत असलेल्या या माकडाच्या पिलाला पाहून अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान या मार्गावरून मार्गस्थ होताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी या माकडाची अवस्था पाहून तातडीने वन खात्याच्या अधिकाऱ्यांना हि बाब कळविली. दरम्यान पशुवैद्याधिकारी बाळू पाटील यांनी तातडीने याठिकाणी येऊन प्रथमोपचार केले.
जखमी झालेल्या माकडाला पाणी पाजतानाचा आमदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Recent Comments