Belagavi

विकेंड कर्फ्यू : बेळगावात दुकाने बंद; जनसंचार सुरूच

Share

महामारी कोरोना आणि रूपांतरित व्हायरस ओमीक्रॉनवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने सरकारने नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. मात्र बेळगावातील जनतेने त्याची पर्वा करता फिरणे सुरूच ठेवले आहे.   

विकेंड कर्फ्यूला शुक्रवारी रात्री प्रारंभ झाला. लोकांचा अनावश्यक संच टाळण्यासाठी पोलिसांनी काळ रात्रीपासूनच प्रमुख रस्ते आणि चौकात बॅरिकेड्स उभारले आहेत. मात्र शनिवारी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ सुरु असल्याचे दिसून आले. सरकारच्या विकेंड कर्फ्यूच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून आले. पोलीस प्रत्येक वाहन अडवून येणं-जाणाऱ्यांची चौकशी करत होते. मात्र तरीही नागरिकांनी दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनातून फिरणे सुरूच ठेवले.

औषध आणण्यासाठी, दवाखान्याला चाललोय अशा सबबी लोक पोलिसांना सांगताना दिसत होते. दरम्यान, रविवारपेठ, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोडसह अनेक ठिकाणी बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. औषध दुकाने, किराणा तसेच दूध व अत्यावश्यक सेवांची दुकाने मात्र सुरु होती.

 

 

Tags: