नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यूची संधी साधत अज्ञात चोरटयांनी गणपत गल्लीतील महिला आघाडी सोसायटीत ३० हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

होय, कोरोना नियंत्रणासाठी सरकारच्या आदेशानुसार नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यूही लावण्यात आला आहे. हीच संधी साधत अज्ञात चोरटयांनी आपला कार्यभाग उरकला. बेळगावातील गणपत गल्लीतील महिला आघाडी को-ऑप सोसायटीची खिडकी तोडून आत प्रवेश करत सुमारे ३० हजार रुपये रोकड लांबवली आहे. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चालविला आहे. नेमके काय-काय चोरीला गेले याची माहिती पोलीस सोसायटी व्यवस्थापनाकडून घेत आहेत.


Recent Comments