Hukkeri

हुक्केरीत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण शिबीर

Share

हुक्केरी नगरपालिका कार्यालयात दिन दयाळ अंत्योदय योजना अभियानांतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपालिका कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ग्रेड २ तहसीलदार किरण बेळगावी, उपाध्यक्ष आनंद गंध, नगरपालिका मुख्याधिकारी मोहन जाधव, वकील अनिल वंटमुरी, व्यवस्थापक जगदीश कुमार, तज्ज्ञ डॉ. उदय कुडची, समाज संघटनाधिकारी गीता कागतीकर आदी उपस्थित होते.

एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. उदय कुडची यांनी व्याख्यान दिले. यादरम्यान उपस्थित व्यापारी-विक्रेत्यांना मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करण्यासंदर्भात माहिती दिली.

ग्रेड २ तहसीलदार किरण बेळवी बोलताना म्हणाले, सामाजिक सुरक्षितता जपून रस्त्यावर व्यापार-विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी असलेल्या सरकारी योजनेसंदर्भात माहिती दिली.

यानंतर जगदीश कुमार यांनी सदर विक्रेत्यांना बँक खाते उघडण्यासंदर्भात तसेच खात्यामुळे मिळणाऱ्या सवलतींसंदर्भात माहिती दिली.

यावेळी हुक्केरी शहरातील विक्रेते, व्यापारी उपस्थित होते.

Tags: