Athani

मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मईच कायम राहतील

Share

नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र बसवराज बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, असंही स्पष्टोक्ती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री बदलासंदर्भात अनेक अफवा ऐकण्यात येत असून यासंदर्भात रमेश जारकीहोळी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अथणी येथे आर एस एस प्रमुखांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. संक्रांतीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.

आगामी निवडणुका आणि राजकारणासंदर्भात अरविंदराव देशपांडे यांची भेट घेण्यात आली असून महेश कुमठळ्ळी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचेही रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठी अरुण सिंग, अमित शहा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणार असून आगामी काळात बसवराज बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Tags: