१ कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येत असलेल्या देवराज अरस इमारत कामकाजाचा आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

चिकोडी येथील इंदिरानगर येथे १ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चातून देवराज अरस भवन इमारत कामकाजाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले देवराज अरस भवन इमारत कामकाज आता सुरु करण्यात आले असून आमदार गणेश हुक्केरी आणि चिकोडीचे स्वामी यांच्या उपस्थितीत कामकाजाला प्रारंभ करण्यात आला..यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी बोलताना सांगितले कि, चिकोडी शहरात देवराज अरस विभागाचे कामकाज गेल्या अनेक दिवसांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु होते. या विभागाची स्वतःची इमारत व्हावी, अशी जनतेची इच्छा होती. यानुसार या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला असल्याचे आमदार म्हणाले. 
यानंतर स्थानिक नगरपालिकेचे सदस्य साबीर जमादार यांनी बोलताना सांगितले कि, देवराज अरस इमारत व्हावी, अशी अनेक दिवसांपासूनची जनतेची इच्छा होती. यानुसार आमदार गणेश हुक्केरी आणि खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून आज या इमारतीचे कामकाज सुरु करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी नगरपालिका सदस्य गुलाबहुसेन बागवान, अनिल माने, रामा माने, इरफान बेपारी, नरेंद्र नेर्लेकर, रामचंद्र शिप्पूरे, मुदसर जमादार, फिरोज कलावंत, राजू गुलगुन्जी, परिशिष्ट समाज कल्याण विभागाचे अधिकारी एस डी सौदागर, मुरुगेश कटकभावी आदी उपस्थित होते.


Recent Comments