Hukkeri

राज्य सरकारी कर्मचारी दिनदर्शिकेचे प्रकाशन

Share

हुक्केरी तालुका पंचायत सभा भवनात राज्य सरकारी कर्मचारी दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यानंतर कर्मचाऱ्यांना उद्देशून बोलताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अनेक मागण्यांसंदर्भात सरकारी पातळीवर आंदोलन छेडण्यात येत असून यासाठी आपण साऱ्यांनी मिळून काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हुक्केरी तालुक्यातील कर्मचारी आणि माजी अध्यक्ष महांतेश नायक यांनी राजीनामा दिला आहे. तालुक्यातील एकाही सदस्याने त्यांना पाठिंबा दिला नाही. यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली एकही सदस्य कार्यरत राहणार नसल्याचेही ते म्हणाले. माजी अध्यक्षांनी गेल्या अडीज वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एकही कार्य केले नाही. केवळ एक सभा घेतल्याचे दाखविण्यात आले असून त्यांना दबावाखाली राजीनामा देण्याची वेळ आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रभारी अध्यक्षपदी अविनाश होलेप्पगोळ हे कार्यरत असून लवकरच अध्यक्ष स्थानासाठी निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी हुक्केरी तालुका प्रभारी अध्यक्ष अविनाश होलेप्पगोळ , गौरवाध्यक्ष एस एस करीगार, एन बी गुडसी, एस एल नायक, ए एस हिरेमठ, गौतम चलवादी, नवीन बाइनाईक, मोहन हेळगेरी, बी के चौगुला, जिल्हा घटकचे चंद्र चलवादी, श्रावण रावनगोळ आदी उपस्थित होते.

Tags: