Chikkodi

चिक्कोडीत गुलाबी थंडी; दाट धुके !

Share

 दक्षिणेतील काश्मीर म्हणवले जाणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोडगूप्रमाणे वातावरण सध्या चिक्कोडीत अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सकाळच्या वेळी दाट धुके आणि बोचऱ्या पण गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत.

चिक्कोडी येथे गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरवणारी थंडी, गार वारे असे वातावरण निर्माण झाले आहे. तशातच सकाळच्या वेळी दाट धुक्याची चादर शहर-परिसरावर ओढली जात आहे. सकाळच्या वेळी थंडीमुळे शेकोट्या पेटवून शेक घेत गुलाबी थंडीचा आनंद घेताना नागरिक दिसून येत आहेत. तर दुसरीकडे कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मात्र मोहोर गळण्याच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत. सकाळच्यावेळी कामावर जाणारे नागरिक मात्र थंडीने हैराण झाले आहेत.

 

 

 

Tags: