Belagavi

कोविडची तिसरी लाट : मुलांना लक्ष्य

Share

कोविडच्या तिसऱ्या लाटेने जोरदार संसर्गाचा वेग पडकला असून बेळगाव जिल्ह्यातील
सीमावर्ती भागात आतापर्यंत 218 मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.

कोविडच्या तिसऱ्या लाटेत बेळगाव जिल्ह्यातील 218 मुलांपैकी 138 मुले ही कित्तुर सैनिक वसतिगृहातील आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांना अद्यापही कोविडचे गांभीर्य लक्षात आले नाही. अनेक शाळांमध्ये कोविड चे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

बेळगाव मधील कित्तुर येथील वसतिगृहात अचानक कोविड रुग्णांची संख्या समोर आली आहे. महाराष्ट्रासह केरळ आणि इतर पराराज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असून याचा परिणाम कर्नाटकातील सीमावर्ती भागात दिसून येत आहे. दररोज 100 ते 200 रुग्णसंख्येनुसार एका आठवड्यात 1000हुन अधिक रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

कित्तुर वसतिगृहातील कोविड प्रकरणामुळे आता सदर विद्यार्थिनींच्या पालकांनाही कोविडची बाधा झाली असून याला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. कोणत्याही कोविड नियमांचे पालन शाळेत किंवा महाविद्यालयात होत नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

एकंदर परिस्थिती पाहता सध्या पुन्हा कोरोनाचे सावट घोंगावत चालले आहे. प्रत्येकाने सरकारी मार्गसुचिनुसार कोविड नियमांचे काटेकोर पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता जपणे अत्यंत आवश्यक आहे.

Tags: