Belagavi

प्रजासत्ताकदिनानिमित्त महत्वाची बैठक पार

Share

बेळगाव शहरात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.

26 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा क्रीडांगणावर अत्यंत साधेपणात तसेच कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही. शहरातील सर्व प्रमुख चौकांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गेल्या 15 दिवसांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मागील 2 वर्षात कोविड मुळे प्रजासत्ताक दिन अत्यंत साधेपणात साजरा करण्यात आला असून यंदाही पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या बोलताना म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रमुख ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविड मार्गसुचिनुसार प्रत्येकाने कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोविड परिस्थितीचा विचार करून, सरकारी मार्गसुचिनुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासह अनेक महत्त्वाच्या सूचना आणि नियम जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. सरकारी आदेशाचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: