Kittur

कित्तूर वसतिगृहातील कोरोना परिस्थितीला प्रशासकीय मंडळ जबाबदार : पालकांचा आरोप

Share

कित्तूर राणी चन्नम्मा विद्यार्थिनी सैनिक वसतिगृहातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला प्रशासकीय मंडळ जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या वसतिगृहात विद्यार्थिनी आणि शिक्षकांसह एकूण १४८ जण कोरोनाबाधित झाले असून शाळेच्या प्रशासकीय मंडळाचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

किटूर राणी चन्नम्मा विद्यार्थिनींच्या सैनिक वसतिगृहात कोरोना रुग्णांची संख्या अधिक होत चालली आहे. सर्वप्रथम १२ विद्यार्थिनींना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत जाऊन गेल्या ५ दिवसात १४८ इतकी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. शाळा प्रशासनाने कोविड नियमांची पायमल्ली केल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

कोविड नियमांचे पालन न करताही शाळा प्रशासनाला तहसीलदारांनी पाठिंबा दिल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असलेल्या रुग्णांना एकत्रित ठेवण्यात येत आहे. शाळा प्रशासन मंडळाचे दुर्लक्ष याप्रकरणी झाले असून कोविड टेस्ट रिपोर्ट येण्याआधीच विद्यार्थिनींच्या पालकांना पत्र पाठवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे देखील कोविड पुन्हा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

पालकांनी केलेला आरोप तहसीलदारांनी फेटाळून लावला असून कोरोनाबाधित प्रत्येक विद्यार्थिनीला राहण्यासाठी विशेष सोय करण्यात आली असून ३५ कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या पालकांसमवेत पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले. पालकांच्या आग्रहास्तव सदर विद्यार्थिनींना पाठविण्यात आले असून नववी पर्यंतच्या ४३२ विद्यार्थिनींना घरी पाठविण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यासह कित्तूर सैनिक वसती शाळेतील कोविड परिस्थितीसंदर्भात तहसीलदारांनी अधिक माहिती दिली आहे.

कित्तूर सैनिक विद्यार्थिनींच्या वसतिगृहात कोविड रुग्णांची संख्या अधिक झाली असून यासाठी शाळेचे प्रशासन मंडळ जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यासाठी तहसीलदारांनाही जबाबदार धरण्यात आले असून तहसीलदारांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. वाढत्या कोविड विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता शाळा प्रशासनाने योग्य निर्णय आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Tags: