Accident

भरधाव ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

Share

 पुणेबेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. वर एम. के. हुबळीजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली.

एम. के. हुबळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. रमीजा मलिकसाब नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे. रमीजा ही महामार्गावरील एमके ढाबा येथे नोकरीला होती. आज सकाळी कामाला जाण्यासाठी महामार्ग ओलांडताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. कित्तूर पोलीस ठाण्याचे पीएसआय बसवराज उल्लागड्डी यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

 

 

Tags: